पुणे महाराष्ट्र

प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील

लोणी | प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मविभूषण डॉ विजय केळकर निवृत्त झाले आहेत. आता यांच्या जागी डॉ राजेंद्र विखे पाटील हे कुलपती पदाची धुरा वाहतील.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आज झालेल्या बैठकीत कोविड 19 महामारीत साथीत तसेच प्रवरा सारख्या ग्रामीण भागात नव्याने आधुनिक आरोग्य सुविधा उभारूण डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून केलेले भरीव कार्य तसेच विद्यापीठाच्या प्रगतीतील व्यवस्थापकीय योगदानाचा विचार करून आज त्यांची सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे.

डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या या निवडी बद्दल अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वाय. एम. जयराज आणि इतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर या निवडी नंतर बोलताना डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठ संशोधन आणि अधिकचा कार्यानुभव यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली प्रतिमा उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या-

एअरहॉस्टेस गँगरेप आणि हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, ही धक्कादायक माहिती आली समोर

“या तीन पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष”

“आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?”

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवे- यशोमती ठाकूर

‘नायक’ सिनेमाप्रमाणे ही तरूणी ‘या’ राज्याची या दिवशी होणार एक दिवसाची मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या