नाशिक महाराष्ट्र

आरोग्य विभागात अत्यावश्यक पदे भरणार- राजेश टोपे

नाशिक |  नाशिक जिल्हात कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच मालेगाव हे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. अशातच नाशिकसह मालेगावमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय तसंच पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. यामुळे येथील आरोग्य विभागात अत्यावश्यक पदे भरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा दूरध्वणीवरून संवाद झाला. यावेळी नाशिकसह मालेगावमधील कोरोनाची वाढती आकडेवारी या विषयावर दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. तसंच नाशिक आणि मालेगावमधली सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या उपायोजनांबाबतही चर्चा झाली.

येणाऱ्या काळात नाशिक जिल्हात कोरोनाबाधित रूग्ण वाढू शकतात ही शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागात केली जाणारी पदभरती जलदगतीने व्हावी याकरिता बुधवारी राजेश टोपे यांच्याशी दूरध्वणीवरून चर्चा केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

मालेगावहे कोरोनाचं हॉटस्पॉट असल्याने येणाऱ्या काळात त्या ठिकाणी रूग्णांची संख्या वाढू शकते. याचकरिता येथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय तसंच पॅरामेडिकल स्टाफची गरज भासणार आहे. यासंदर्भातलाच प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती देखील भुजबळ यांनी यावेळी दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

बीड जिल्हा कोरोनामुक्त; धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचं कौतुक

रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांना छगन भुजबळांचा दणका; केली मोठी कारवाई

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या