Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या 1 लाखांवर तर आतापर्यंत 957 रूग्ण बरे झालेत, घाबरू नका- राजेश टोपे

मुंबई |  महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्यांचा वेग वाढला पाहिजे, अशी मागणी सगळीकडूनच होत आहे. आपण चाचण्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 2 हजार 189 नमुन्यांपैकी 94 हजार 458 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत तर 6817 जण पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

शनिवारी राज्यात नवीन 394 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या 6817 वर जाऊन पोहचली आहे. तर 50 वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी झाल्याची दिलासादायक माहिती टोपे यांनी दिली आहे.

शनिवारी 117 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीत काळजी घेण्याचं अधिक काम आहे.

दरम्यान, सध्या राज्यात 1 लाख 19 हजार 161 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8814 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या