बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धनंजय मुंडेंच्या प्रकृतीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलत होते.

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अ‍ॅडमिट करणार आहोत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. श्वास घेताना थोडा त्रास जाणवत आहे. पण सर्व नियंत्रणात आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलंय.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण काळजी घेतली होती. त्यामुळे संसर्गाची भीती नाही. पण लक्षण दिसली तर मंत्री क्वारंटाईन होतील, असंही राजेश टोपेंनी सांगितलंय.

दरम्यान, कोरोनासोबत जगताना जी काळजी घ्यावी लागणार आहे, ती सर्व खबरदारी घेतली जाते. बैठकीत सर्वांनी मास्क लावले होते. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही, हे हाय रिस्क काँटॅक्ट नाहीत. नाहीतर अख्खं मंत्रीमंडळच क्वारंटाईन व्हावं लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

भारतानं अमेरिकेला साथ दिली तर…; चीनची भारताला धमकी

मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले- राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

‘…हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल’; आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे

सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार?- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More