बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; राजेश टोपेंचं धक्कादायक वक्तव्य

मुंबई | दोन दिवसांपूर्वीची नाशिकमधील पालिकेच्या रूग्णालयातील ऑक्सिजनची टाकी लीक झाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना आता वसईच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.  विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. आपण रेमडेसीवीर बाबत बोलू शकतो. ऑक्सिजन बाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल, असं राजेश टोपे म्हणालेत.

टोपे यांच्या या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवाल दरेकर यांनी केला आहे. सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या आहेत. त्यामुळेच हे लोक बेताल बडबड करत आहेत, अशी टीका दरेकरांनी केली आहे.

या दुर्घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

केंद्र सरकारची बाजू मांडत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

विरार रुग्णालय दुर्घटनेबद्दल नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त; नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

कडक लॉकडाऊनसंदर्भात तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे वाचा एकाच ठिकाणी

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर, आम्ही मदत करण्यास तयार- चीन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More