महाराष्ट्र मुंबई

‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

Loading...

मुंबई | राज्य शासनाकडून सध्या कोरोनाबाधित व्यक्तींचे ट्रेसिंगनंतर त्यांची टेस्टिंग आणि ट्रिटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.

शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग, तसेच अन्य आपत्कालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.

गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचारांची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नका, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 153 झाली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत साधला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील नर्सशी संवाद

महत्वाच्या बातम्या-

भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश; पाहा सूक्ष्मदर्शकाखाली कोरोना कसा दिसतो

लोक अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करतायेत हे सगळं बघून मला धक्काच बसला- उद्धव ठाकरे

शिकला तितकाच हुकलेला! क्वारंटाईन असतानाही IAS केरळवरुन कानपूरला पळाला

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या