बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वेळ आली तर…”; राजेश टोपेंचा महाराष्ट्राला मोठा इशारा

मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी खुलासा केला आहे.

“लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो. त्याच्यावर लॉकडाऊनचा थेट परिणाम होतोे. लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनची झळ सोसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. पंतप्रधानांनीदेखील जान हैं तो जहान है, असं सांगितलं आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

राजेश टोपे यांनी यावेळी लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे. लॉकडाऊनचा विषय सध्या अजिबात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभाग टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत कुठेही लॉकडाऊनची चर्चा नाही. मात्र निर्बंध जरूर वाढविले जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, राजेश टोपे यांनी यावेळी निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहितीही दिली आहे. निर्बंधाच्या बाबतीत नक्कीच कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत. तरीही कोरोना नियंत्रणात आला नाही तर रेस्टॉरंट, सिनेमाहॉल, मॉल, शाळा-कॉलेजबाबत निर्णय घ्यावा लागेल, असंही टोपे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

आरोग्य सचिवांचं कोरोनाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाले…

‘कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतील कारण…’”; तज्ज्ञांचा धक्कादायक खुुलासा

“नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे”

“गल्लीत क्रिकेट जिंकणारे आता वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत”

“कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्याला भाजप जबाबदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More