राजनाथ सिंहांनी नाकारला सोन्याचा मुकुट, म्हणाले…

लखनऊ | मुरादाबाद येथे आयोजित केलेल्या ‘शक्ती’ संमेलनात केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. गृहमंत्र्यांचं स्वागत करताना मुरादाबादचे खासदार सर्वेश सिंह यांनी त्यांना सोन्याचा मुकुट देऊ केला, मात्र नम्रपणे राजनाथ सिंह यांनी तो मुकुट स्वीकारण्यास नकार दिला. 

मतदार क्षेत्रातील एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नामध्ये हा मुकुट द्या, असा सल्ला सिंह यांनी त्यावेळी दिला. 

सोन्याचं मुकुट नाकारुन आणि त्यासोबत दिलेल्या बहूमोल सल्ल्याने राजनाथ सिंह यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांची मनं जिंकली. 

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारला 100 गुण दिले. योगींमुळे गुन्हेगार घाबरले आहेत, ते उत्तर प्रदेशमधून पळ काढतायेत, राज्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे, असंही ते त्यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-जळणाऱ्यांनो जळत रहा!; सामनातून भाजपला वाकुल्या

मतदारांसमोर हात जोडून-झुकून जा, विरोधकांसमोर ठोकून जा- आशिष शेलार

-कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत; स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं! 

-“…तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील” 

-जो भ्रष्ट उसको मोदी से कष्ट है- नरेंद्र मोदी 

Google+ Linkedin