इतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत

चेन्नई | ‘इतर पक्षांना जर भाजप धोकादायक वाटत असेल, तर ते तसे असलेच पाहिजे’ असं सुचक वक्तव्य अभिनेते आणि राजकारणी रजनीकांत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या दक्षिणेत पाय रोवण्याच्या मनसुब्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी आपल्या पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून त्यांची भाजपशी जवळीक असल्याचं बोललं जात होतं. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे दक्षिणेतील समिकरणे बदलण्याची चिन्हं आहेत.

याशिवाय रजनीकांत यांनी नो़टाबंदीच्या निर्णयावर असणाऱ्या त्यांच्या भूमिकेवरुनही घुमजाव केलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयावर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं होतं.

मात्र, अाता त्यांनी अंमलबजावणीच्या त्रुटीवर बोट ठेवलं आहे. सरकारने अगोदर नीट अभ्यास करायला पाहिजे होता, असं रजनीकांत यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!

-स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन

-…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं!

-भाजपला धक्का!!! धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार