नागपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मालमत्ता विकल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. त्यातच आता काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी नरेंद्र मोदी सरकारने सार्वजनिक मालमत्ता विकल्याचा आरोप केला आहे. देशाला पुन्हा पारतंत्र्यात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं म्हणत बाळू धानोरकर यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
वर्षाला दोन कोटी रोजगार देणार, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रूपये टाकणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. परंतु, सात वर्षानंतरही मोदी एकही आश्वासनातील एकही गोष्ट पुर्ण करू शकले नाहीत, असं बाळू धानोरकर यांनी म्हटलं आहे.
यावेळी बाळू धानोरकर यांनी मोदी सरकारने सामान्यांचे कंबरडे मोडले आणि लहान उद्योजकांना देशोधडीला लावले, असे आरोप त्यांनी मोदी सरकारवर केले आहेत. 100 दिवसांत महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणत देशाची चौकीदारी करण्याची आश्वासने दिली होती, असं म्हणत बाळू धानोरकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सात वर्षात महागाई एवढी वाढली आहे की, लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. नोटबंदीने देशातील छोटे ,लघू, मध्यम उद्योग बंद पडले. बेरोजगारी प्रचंड वाढली, काळे कायदे आणून शेतकरी आणि कामगार देशोधडीला लावले, अशी टीका बाळू धानोरकर यांनी केली आहे. तसेच बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, असंही धानोरकरांनी म्हटलं आहे. बाळू धानोरकरांच्या या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
थोडक्यात बातम्या-
भारत करणार लवकरच लसीकरणात विक्रम, लस घेणाऱ्यांची संख्या 100 कोटींच्या घरात
“शरद पवार भिजल्याची बातमी झाली, पण…”; ‘या’ नेत्याचा पवारांवर हल्लाबोल
“आमची दिवाळी जर अंधारात जाणार असेल तर, मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही”
आर्यन खानचं समुपदेश केलं मग पुरावे द्या! नवाब मलिकांचं NCB ला खुलं आव्हान
“….म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत”
Comments are closed.