मुंबई | विमा कंपन्यांनी कमावलेल्या करोडो रुपयांच्या नफ्यात कुणाचा वाटा आहे ते सर्वांना माहीत आहे. आणि ही नौटंकी आता चालनार नाही, असं म्हणत राजू शेट्टींनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
विमा कंपन्यांबरोबर जो करार झाला त्यातील नियम आणि अटी या सरकारनेच ठरवलेल्या आहेत. करार झाल्यानंतर विम्याच्या रकमा जमा करुन घेतल्या होत्या त्यावेळी झोपा काडत होता का? असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे.
शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पीकविमा कंपन्यांवर मोर्चा काढला. यावरूनच विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे.
दरम्यान, आगामी विधानसभेच्या तोंडावर ‘इशारा मोर्चा’ म्हणजे शिवसेनेची नौटंकी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-