कोल्हापूर महाराष्ट्र

…आता तर मुख्यमंत्री आहात, मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्या- राजू शेट्टी

कोल्हापूर | शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. पूर चक्रीवादळ आणि आता ओला दुष्काळ यासारख्या संकटातून शेतकरी जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून त्यांना लगोलग मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणालेत.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारने पंचवीस हजार रुपये हेक्‍टरी मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते. मात्र आता ते मुख्यमंत्रीपदावर आहेत. आता पंचनामे बाजूला ठेऊन त्यांनी मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यावा, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्याला आता सरकारच्या मदतीची गरज आहे. अशावेळी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन बळीराजाला तातडीने मदत देऊन आधार द्यावा, असंही राजू शेट्टी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मदरशांचं अनुदान तुम्ही सत्तेत असताना बंद का केलं नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या