पुणे महाराष्ट्र

राज्यपाल कोट्यातील एक जागा देण्याचं तीन महिन्यापूर्वी ठरलं होतं, पण आता…- राजू शेट्टी

पुणे | राज्यपाल कोट्यातून एक जागा स्वाभीमानीला देण्याचं ठरलं होतं. पण तीन महिन्यानंतर काय झालं मला माहिती नाही. आता राष्ट्रवादीकडून कुठलाही निरोप नाही’, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होतं.

तीन महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये जात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा स्वाभिमानीला देण्याचा शब्द त्यांनी दिला होता, पण आता काय झालं, मला माहिती नाही, असं राजू शेट्टी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

आता कुमार सानूची ‘जान वाचणं’ कठीण आहे!- शालिनी ठाकरे

भाजपची भूमिका डबल ढोलकी’; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे’; मराठा आरक्षणावरून पाटलांचा गौप्यस्फोट

‘दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केला’; उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या