औरंगाबाद महाराष्ट्र

…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचं समर्थन असेल- राजू शेट्टी

औरंगाबाद | मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुकारलेल्या मोर्चाची मागणी बाहेरच्या देशातील घुसखोरांना हाकलून द्या एवढीच असेल तर आमचा राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. ते औरंगाबमध्ये बोलत होते.

बाहेरच्या देशातून जे घुसखोर येतात त्यांचं समर्थन कुणीही करणार नाही. आम्हीही करत नाही. त्यामुळे बाहेरच्या घुसखोरांना हुसकाऊन लावा इतकी राज ठाकरेच्या मोर्चाची मागणी असेल तर आमचा त्याला पाठिंबा आहे, असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

संविधानाने या देशात जात, धर्म, लिंग आणि पंथ या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. सीएए कायदा या आश्वासनाला हरताळ फासणारा आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, एनआरसीमध्ये जवळपास 40 टक्के लोकांना आपला जन्माचा पुरावाच देणं अशक्य आहे, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर

मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबा नगरहून मुंबईत दाखल!

महत्वाच्या बातम्या- 

“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही”

ओबीसींचा रकाना सामाविष्ट न केल्यास जनगणनेवर बहिष्कार- नाना पटोले

उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या