बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वच्छ चारित्र्याच्या चंद्रकांत पाटलांच्या पत्रानंतर जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाली, ही कारवाई राजकीय हेतूने आहे”

कोल्हापूर | सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्ववर साखर कारखान्यावर ईडीने काल कारवाई केली आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे. ईडीच्या कारवाईनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रानंतर ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर ही कारवाई झाली. चंद्रकांतदादा हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. आता त्यांनी जरंडेश्वर कारखान्याप्रमाणेच इतर कारखान्यासंदर्भात देखील अशीच पत्रे लिहावीत. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे.

तसेच मागील पाच वर्षांपासून ईडी झोपली होती का?  मी कोणालाही सर्टिफिकेट द्यायला इथे आलो नाही. मात्र, राजकीय हेतूनेच ही कारवाई केली जात आहे. ईडी एकप्रकारे राजकीयदृष्ट्या काम करत आहे, असं देखील राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री केली असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी यापुर्वीच मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटलेत, रोहित पवारांचीही चौकशी करा- भाजप

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव येताच अण्णा हजारे म्हणाले…

महाराष्ट्रात ईडीच्या मार्फत सत्तांतर करण्याचा डाव???; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

मामाच्या साखर कारखान्यावर ईडीची कारवाई होताच अजित पवार म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More