बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका, म्हणाले…

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पावर अनेक जणांंनी टीका केली तर अनेक जणांनी या अर्थसंकल्पाची स्तुती केली. आता या अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघंटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही 50 हजार रुपये देऊ. मात्र या अर्थसंकल्पात त्याचा काहीही उल्लेख केला नाही. कर्जमाफीसाठी जे शेतकरी अपात्र ठरले होते, त्याबाबतही एकही शब्द अजित पवार यांनी काढला नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. देवळं बांधूून माणसं उभारता येत नाही. माणसं उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं राजू शेट्टी म्हणाले.

हा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. शेतकऱ्यांना यातून कोणतीही मदत मिळाली नाही. ठाकरे सरकारची कर्जमाफी ही सर्वात फसवी कर्जमाफी आहे. वीज बिल माफीसाठी कोणताही दिलासा दिला गेला नाही, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा की महाराष्ट्र राज्याचा? राज्य सरकार त्यांना एकही पैसा देत नाही, त्याही योजना या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आल्या. मागील सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या आणि सध्या सुरु असलेल्या योजनांचाच अर्थसंकल्पात उल्लेख केला आहे, अशी टीका देखील फडणवीस यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक!

तपासाला सहकार्य करणाऱ्या खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल !

पोटात चाकू खुपसून बायकोने केली नवऱ्याची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चा दिल्लीत सत्कार; आजींना पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ

शिवसेनेकडून व्हिप जारी; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More