“पवार कुटुंबीयांचे शेअर्स आहेत की नाहीत…”; राजू शेट्टींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
सांगली | शेतकरी हा निर्सगाच्या न्यायावर आणि सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये योग्य समन्वय राहिला नाही की मग रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू होतो. असाच संघर्ष सध्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर राज्य सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या याच मुद्द्यांना हात घालत स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार फक्त कारखानदारांच्या भल्याचा विचार करत आहे. कारखानदार आणि सहकार आयुक्त हे सरकारच्या ताटाखालचे मांजर असल्याची जहरी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी किती दिवस यांच्या पाठीशी उभं राहायचं हे ठरवावं. राज्याचे सहकार मंत्री आणि राज्यमंत्री हे बेकायदेशीर पद्धतीनं ऊसामध्ये कपाती करतात. मग न्याय मागायचा कुठे?, असा सवाल शेट्टी यांनी सरकारला विचारला आहे. खाजगी वीजनिर्मीतीमध्ये पवार कुटुंबाचे शेअर्स आहेत की शेअर्स नाहीत, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर करावं, असं आव्हान शेट्टी यांनी पवार यांना दिलं आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. परिणामी ठाकरे सरकारला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
थोडक्यात बातम्या –
‘मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली’, किरीट सोमय्यांच्या दाव्याने नवी खळबळ
ऐतिहासिक निर्णय, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील तब्बल ‘इतक्या’ दोषींना फाशीची शिक्षा
‘सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार’, निलेश राणेंची तोफ कडाडली
‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’; मराठमोळ्या गायिकेचा धक्कादायक खुलासा
“वेडा माणूस इकडे तिकडे फिरत आहे, जेलमधे जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत”
Comments are closed.