नवी दिल्ली | राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं आज निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अमर सिंग यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते सिंगापूरमधील रूग्णालयात दाखल होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं होतं. अखेर वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यापूर्वी 2013 मध्ये त्यांना किडनीची समस्या देखील उद्भवली होती.
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी त्याचे घनिष्ट संबंध होते. मात्र दरम्यानच्या काळात या दोघांच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. अमिताभ आणि अमर सिंह यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती.
2016 मध्ये त्यांची खासदार म्हणून निवड झाली होती. केंद्रामध्ये काँग्रेसप्रणित युपीएचं सरकार असताना अमर सिंह यांचं नाव सातत्याने चर्चेत राहिलं. मुलायम सिंग यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना त्या काळात अमर सिंह यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
महत्वाच्या बातम्या-
सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडं’- चंद्रकांत पाटील
दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हेल्मेट वापरल्यास होणार दंड!
अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत
वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!