बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संसदेत पेगॅसस प्रकरणावरून गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMCच्या खासदारांना केलं निलंबित

नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशात पेगॅसस प्रकरण खुप चर्चेत आहे. काही खासदारांनी पेगॅसस प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी खासदार केली होती. यावरून संसदेच्या सभागृहात गदारोळ घातल्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी तृणमूल काॅंग्रेसच्या खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केलं आहे. तसेच यावर सर्वोच्च न्यायालयाने विशेष लक्ष द्यावं अशी मागणी देखील खासदारांनी केली आहे.

पेगॅसस प्रकरणाबद्दल निलंबित केलेल्या खासदारांनी राज्यसभेत आवाज उठवला होता. तसेच याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने देखील तपासणी करावी अशी मागणी या खासदारांनी केली होती. त्यामुळे सभागृहातील वेलमध्ये प्रवेश करणे, फलक लावून घोषणा देेणे आणि नियम 255 अंतर्गत राज्यसभा अध्याक्षांच्या खूर्चीचा अपमान केल्यामुळे त्यांना निलंबित केलं आहे.

तृणमूल काॅंग्रेसच्या सदस्या डोला सेन, अर्पिता घोष, नदीम उल हक, अबीर रंजन बिस्वास, आणि मौसम नूर या खासदारांना सभागहात गदारोळ घालल्यामुळे व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाच्या कामकाजातून त्यांना निलंबित केलं आहे.

दरम्यान, सकाळी 11 वाजता संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यापासून सभागृहात अडथळे येत होते. त्यातच खासदारांनी घोषणाबाजी देण्यात सुरूवात केली होती. त्याबाबतीत खासदारांना अध्याक्षांनी खाली बसण्यास सांगितलं. नियम 255 लागू करण्याचा इशारा दिला होता. परंतु खासदारांनी ऎकलं नाही. खासदारांच्या या गदारोळात संसद सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत अध्यक्षांनी तहकुब केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

प्रियांका चोप्राने मुंबईमधील दोन अलिशान बंगले विकले, ‘इतक्या’ कोटींची झाली डील

भारतासाठी आनंदाची बातमी! रवी दहियाचा धोबीपछाड देत फायनलमध्ये प्रवेश, सुवर्णपदकाची संधी

पत्नीचा वाढदिवस विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने केलं असं काही की…

“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More