नवी दिल्लाी | भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांनी 92 वर्षीय सेवा चंद बालयान यांना आपल्या खांद्यावर घेतल्याचं दिसत आहे.
वृद्ध शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातूनच आम्हाला समर्थन द्यावे. या आजोबांना आम्ही त्यांच्या गावी सोडलेले, मात्र ते पुन्हा आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत, असं राकेश टिकैत म्हणाले.
गाझीपूर सीमेवरील हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेवाचंद बालयान हे मुझफ्फरनगरमधील असून त्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला आहे.
दरम्यान, 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. येत्या 6 जानेवारीला म्हणजे उद्या देशभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती”
“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की होतीये”
आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात- पंकजा मुंडे
“आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं ‘गरम रक्त’ सांडलं त्या गडकिल्ल्यांवर मुलांना न्यायला विसरू नका”
“‘रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजप नाही”