बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकरी उध्वस्त होत आहेत, जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत घरी जाणार नाही”

नवी दिल्ली | केंद्र सरकारने नव्याने संमत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. तरी देखील अद्याप केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. राकेश टीकैत सतत मोदी सरकारवर कृषी विधेयकावरुन बरसताना दिसत आहेत. मात्र, मोदी सरकार मागे हटण्यास तयार नाही. अशातच आता टीकैत यांनी पुन्हा एकदा ट्वीटरवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

सामान्य माणूस उध्वस्त होत आहे. शेतकरी उध्वस्त होत आहे. सर्व काही महाग झाले आहे. आज महागाईचा दर नियंत्रणाबाहेर जात आहे. कंपनीचे सरकार जोपर्यंत कायदा परत घेत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही, असं टीकैत यांंनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

खुशखबर! पुण्यात ‘इतक्या’ रुपयांमध्ये करा एसी बसने प्रवास

रशियाचं बेपत्ता विमान समुद्रात कोसळलं, 28 जणांचा मृत्यू

दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ‘या’ चार मंत्र्यांचा राजीनामा

‘दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो’; शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More