बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका!

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) तीच्या हटक्या लूक्समुळे आणि फो़टोंमुळे कायम चर्चैत असते. तसेच ती सामान्यांमध्ये लवकर मिक्स होते आणि तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर(Social Midia) चांगलेच व्हायरल होत असतात. पण सध्या तीच्या एका व्हिडीओमुळे ती अडचणीत आली आहे. मुंबईत केलेल्या तीच्या कृत्यामुळे तीचे चाहते देखील तीच्यावर नाराज आहेत.

काही दिवसांपूर्वी राखी सावंत अंधेरी येथे खरेदी करण्यासाठी भर रस्त्यात म्हणजेच तीच्या गाडीच्या मागे अनेक गाड्या असताना देखील गाडी रस्त्यात उभी करून खाली उतरली. त्यामुळे इतर वाहनांची कोंडी झाली. ती येईपर्यंत तीच्या गाडीच्या मागे वाहनांची रांग लागली होती. त्यावेळी हम जहा खडे होते है वहासे लाइन शुरू होती असंही तीने वाहन चालकांना सुनावलं. त्यामुळे नागरिक तीच्यावर चांगलेच संतापले आहेत.

तीच्या या कृत्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तीचे चाहतेही तीच्यावर नाराज झाले आहेत. यावर नेटकरी अनेक कमेंट्स करत तीला सुनावत आहेत. ती अशी सर्वसामान्यांच्या वाहतुकीला अडथळे आणू शकत नाही. तीच्यावर पोलिसांनी(Police) कारवाई करावी, अशी मागणी एकाने केली आहे.

अंधेरी लोखंडवाला ओशिवरा सीटीझन्स असोसिएशनने राखी सावंतचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावर ओशिवरा वाहतूक विभागाचे वरिष्ठक निरीक्षक दिलीप भोसले यांनी माहिती दिली की आम्ही वाहतुकीत अडथळे आणणाऱ्या वाहनाविरूद्ध चलन काढले आहे. मुंबईत अशा प्रकारे कृत्य केल्यास 500 रूपायांचा दंड भरावा लागतो.

थोडक्यात बातम्या-

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर नवा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर!

मोठी बातमी! दीपाली सय्यद दिल्लीत अमित शहांची भेट घेणार

शरद पवारांनी शिवसेना संपवली?, उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले…

“नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More