बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राखी सावंतचा नवा ड्रामा ‘या’च्यासाठी झाली दिवानी मस्तानी; पाहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूडची ड्रामा गर्ल राखी सावंत कधी काय करेल काही सांगता येत नाही. बोल्ड, बिनधास्त स्वभावाची राखी सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. कधी ती पीपीई किट घालून भाजी आणायला जाते. तर कधी आणखीनच काही. आता तर ती चक्क कोणासाठी तरी दिवानी मस्तानी झालेली दिसत आहे.

सोशल मीडियावर राखीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती मस्तानी बनली आहे. ती तिचं प्रेम मुंबईच्या रस्त्यांवर शोधत आहे. राखीनं ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील मस्तानीबाईचा पोशाख घातला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर ती तिचं प्रेम शोधत आहेत. तसच, राखीनं असही म्हटलं आहे. ‘झलक दिख ला जा’ शो सुरू करा तिथे तरी मला माझा पती भेटेल.

आणखी एक व्हिडीओ आहे ज्यात ती बाजीरावला शोधत आहे. ती म्हणतेय, ‘ना व्हॅक्सिन मिळत आहे, ना कपड्यांचं दुकान उघडत आहे. त्यामुळे मी भटकत आहे, ना मुंबई उघडतेय, ना लॉकडाउन हटतोय, मी खूप चिंतेत आहे. ना मी ‘खतरोंके खिलाडी’ मध्ये जाऊ शकले, ना मी विवाहीत असून मला माझा पती मिळाला, एक संधी होती मला माझ्या नवऱ्याला भेटायची ‘नच बलिए’ मध्ये तर तो शो ही आता बंद होत आहे. आता मी माझ्या नवऱ्याला रितेशला कशी भेटू. तुम्ही मला मीरा बोला किंवा मस्तानी मी माझ्या बाजीरावला शोधत आहे.’

दरम्यान, राखीचा यात नेहमीच हटके अंदाज पाहायला मिळत आहे. तिचे व्हिडीओ नेहमीच मनोरंजक ठरतात. लॉकडाउन असला तरीही राखी काही सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतच असते. मीडिया तिला स्पॉट करते, तेव्हा राखी नेहमीच तिच्या खास आणि विनोदी शैलीत उत्तर देताना दिसते. सध्या मात्र राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmyzone 💙 (@filmyzone007)

 

थोडक्यात बातम्या –

विवाहीत प्रियकराला घरी बोलावून त्याचीच केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अरे बापरे! नवरदेवाला हळद लावण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

कुलूप लावलेल्या घरात पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं पुढे झाला हाय होल्टेज ड्रामा

‘क्या हुवा तेरा वादा…जयंतराव जी’; जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More