बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राखी सावंतचा भालाफेकीचा कारनामा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

मुंबई | बाॅलिवूडची ड्रामा गर्ल आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते. मीडियासमोर काहीही बरळत असते, त्यामुळे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल होत असलेले पाहायला मिळत असतात. अशातच राखी पून्हा एकदा व्हिडीओमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये राखी भालाफेकीचा सराव करताना दिसत आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानं सध्या राखीवर हे वेड चढल्याचं दिसतंय.

नीरजची नकल काढत राखीनं मुंबईच्या रस्त्यावर एक काठी घेऊन भालाफेकीची प्रॅक्टिस केली. पण तिचा नेम चुकला आहे आणि ती काठी थेट एका व्यक्तीच्या डोक्यावर जाऊन बसली. त्याला जास्त लागलं नाही. मात्र या मजेशीर व्हिडीओवर सध्या अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

दरम्यान, बिग बाॅसनंतर राखी चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. तिचं नेहमी सोशल मीडियावर काही न काही सुरु असतंच. त्यामुळे आपल्या चित्र विचित्र कारनाम्यांमुळे राखी सतत चर्चेत असते.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”

आता विदेशातील नागरिकही घेऊ शकतात भारतात लस, केंद्राचा महत्वपुर्ण निर्णय

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले

UPSC उमेदवारांची चिंता वाढली; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम

नवरा-नवरीचे फोटो काढण्यात धुंद असलेल्या फोटोग्राफरची ‘अशी’ झाली फजिती, पाहा व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More