Top News जळगाव महाराष्ट्र

‘पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर…’; रक्षा खडसे आक्रमक

Photo Credit- Facebook/ Raksha Khadase, Sanjay Rathod

जळगाव | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण विरोधी पक्षानेही लावून धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि रावत मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे महिलांचा सन्मान, महिलांना आरक्षण म्हणायचं आणि पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर यापेक्षा दुःखाचा विषय महाराष्ट्रासाठी काय असेल, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आपली महाराष्ट्रातली संस्कृती कुठे चालली आहे?, असा सवालही रक्षा खडसेंनी केला आहे.

महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात पुढे येत आहेत. त्यात काही मोठे लोक आणि मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचं कळतं हा दुःखाचा विषय असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या. रक्षा खडसेंआधी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांच्यावर आरोप करत पूजा चव्हाणच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी संजय राठोड यांच्यावर कोणताही आरोप केला नाही. संजय राठोड यांचा काहीही संबंध नसल्याचं माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“स्वयंघोषित ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावला”

“…पण जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही”

कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर…- अजित पवार

“माझा अरुण बेकसूर हाय…त्याच्यावरील संमदे आरोप खोटे हाय”

“शिवजयंतीवरुन राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या