बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्षकच बनला भक्षक! पती कोरोनामुळे रुग्णालयात असल्याची संधी साधत पोलिसाने केला महीलेवर बलात्कार

सोलापूर | सोलापूर येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये रक्षकच भक्षक बनला असून एका पोलिसानेच महिलेचा बलात्कार केला असल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिलेचा पती कोरोनामुळे रुग्णालयात आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना 23 एप्रिलला घडली असून आरोपीचं नाव रवी मल्लिकार्जुन असं आहे. आरोपी हा पोलीस म्हणून कार्यरत आहे. तसेच संबंधित आरोपीची पीडित महिलेवर अनेक दिवसांपासून नजर होती. आरोपी महिलेला तो मेसेज करत होता. तसेच येता-जाता तिच्या खिडकीकडे बघून हसायचा, ओळख करण्याचा प्रयत्न देखील करायचा.

दरम्यान, पीडित महिलेचा पती कोरोना पाॅझिटिव्ह झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट केलं असल्याचं आरोपीला माहिती होतं. याच संधीचा फायदा घेत आरोपी रात्री महिलेच्या घरी पोहोचला. महिलेने दार उघडताच आरोपीने घरात जाऊन दरवाजा बंद केला. यावेळी मला तु आवडते आणि माझं तुझ्यावर प्रेम असल्याचं आरोपीने महिलेला सांगितलं.

दरम्यान, महिलेने जर विरोध केला आणि आरडाओरडा केला तर तुझीच बदनामी होईल, असं सांगून आरोपी पोलीस तिची ओढाओढ करु लागला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणानंतर पीडित महिलेने आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘रूग्ण तडफडेल, तरी तुम्हाला अॅम्ब्युलन्स मिळणार नाही’; अॅम्ब्युलन्स मालकाची अरेरावी

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, म्हणाले…

पत्रकाराच्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले,’कोण संभाजीराजे?’

महाराष्ट्रातील ‘या’ शहराची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 94 टक्यांवर

यास चक्रीवादळाचं कव्हरेज करताना महिला पत्रकार ढसा ढसा रडली, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More