‘द बेस्ट ऑस्कर एव्हर’ म्हणत राम गोपाल वर्मांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली
नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला.
डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलं, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसे नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, असं मोदी म्हणाले. मात्र मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले. यावरून बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. हा एक एडिटेड मॉर्फ व्हिडिओ आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स ऑस्कर विजेत्याचे नाव घोषित करत असते. यावेळी मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील भावूक भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे.
या व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्री जेनिफर अँड ऑस्कर गोज टू, असे म्हणते आणि त्यानंतर स्क्रिनवर ऑस्कर पुरस्कार घेतलेले ‘एडिटेड’ मोदी दिसतात आणि सभागृहातील लोक टाळ्या वाजवतात. हा व्हिडीओ शेअर करत राम गोपाल वर्मा यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे.
THE BEST OSCAR EVER🙏🙏🙏 pic.twitter.com/KRfD0UTlrb
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 22, 2021
थोडक्यात बातम्या-
पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; दोन दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू
‘माझी आईच जेवण बनवते पण 2 दिवस झाले ती झोपलीये,…’; आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिली मुलगी
सावध व्हा, या शहरात 341 चिमुरड्यांना कोरोनाची बाधा, काळजी घ्याच…!
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आणि केरळला गुजरातपेक्षा जादा मदत करावी- सुब्रमण्यम स्वामी
“मविआ सरकारच राज्याला लागलेला कोरोना म्हटलं तर राऊतांना आवडेल का?”
Comments are closed.