महाराष्ट्र मुंबई

“4 हजार कोटी बरबाद करण्याचा शौक असेल तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे”

मुंबई | महाराष्ट्रातील करदात्या जनतेच्या 4 हजार कोटींची उधळपट्टी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

राज्यातील 4 हजार कोटींची बरबादी ही करदात्या महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची बरबादी आहे. ज्या ठिकाणी आरेत हे कारशेड बनणार होतं, त्या ठिकाणी झाडं नाही. रोपट्याचं पान तोडण्याचीही आवश्यकता नाही. पूर्णपणे क्रिकेट, फुटबॉल खेळू शकतो एवढं मोठं मैदान तयार झालं आहे, असा दावा राम कदम यांनी केला आहे.

केवळ इगोपोटी किंवा खोट्या स्वाभिमानापोटी हे महाराष्ट्राचे सरकार जनतेचे 4 हजार कोटी वाया घालवत आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.

एवढाच जर 4 हजार कोटी बरबाद करण्याचा शौक असेल तर सर्व मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले करावे. करदात्या जनतेच्या 4 हजार कोटींचा उधळपट्टी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…तर भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

…हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र- किशोरी पेडणेकर

भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी

‘राज्यात हजारो रोजगार उपलब्ध होणार’; ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार

मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या