मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव यांनी सावरकर सभागृहातून भाषण केलं. पण त्यांच्या भाषणात सावरकरांबद्दल एकही शब्द नव्हता. बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय.
शिवसेनेनं सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचं आयोजन करून हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानंही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात, असं राम कदम म्हणालेत.
दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आहे?, असा सवाल करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये.
महत्वाच्या बातम्या-
”सावरकरांचा पुळका’ असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत?’; राऊतांचा भाजपला सवाल
…यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?- कंगणा राणावत
“एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा”
“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”
Comments are closed.