बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पटोले आडाणी भाषेत टीका करतात, मग दानवेंनी केली तर मिरच्या झोंबल्या का?”

औरंगाबाद | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या खुमासदार भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जन-आशीर्वाद यात्रेत बोलताना मात्र दानवे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दानवे यांनी त्यांना थेट सांड अशी उपमा देऊन टाकली. त्यावरुन काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता यावरून भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

नाना पटोले हे नेहमीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच राज्यातील भाजप नेत्यांवर एकेरी शब्दात आगपाखड करतात. अडाणी भाषेची त्यांची संस्कृती आहे. मग केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर टीका केली तर काँग्रेसवाल्यांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या?, असा सवाल भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे गेल्या चाळीस वर्षापासुन राजकारणात आहेत. अस्सल ग्रामीण राजकीय नेतृत्व असुन राजकीय आरोप-प्रत्यारोप त्यांना काँग्रेसवाल्यांनी शिकवण्याची गरज नाही, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

आपला तो बंड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही राजकीय असभ्यता काँग्रेसवाल्यांची असुन अगोदर त्यांनी आपलं नेतृत्व काय बोलतं? याचं आत्मपरिक्षण करावं, असा सल्ला कुलकर्णी यांनी काँग्रेसला दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?

मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, ते…- नाना पाटेकर

योगी सरकारची मोठी घोषणा; राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला देणार ‘हे’ नाव

पुढचे ‘इतके’ दिवस पावसाची दडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

पंजशीरचे वाघ तालिबानवर पडले भारी; 300 तालिबान्यांना केलं ठार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More