महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

भाजपची सेनेला धमकी; पुन्हा एनडीएत स्थान नाही

मुंबई |शिवसेनेला भविष्यात NDA मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं जाण्याची शक्यता नाही. शिवसेनेने आमच्या नेत्यांवर नाव घेऊन टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मला पुन्हा शिवसेनेला पुन्हासोबत घेतील शक्यता दिसत नाही. शिवसेनेकडूनही तसे कोणतेही संकेत मिळत नाहीत, असं भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे ‘जोसेफ गोबेल्स’ असल्याची टीका राम माधव यांनी केली. जोसेफ गोबेल्स हा हिटलरचा सहकारी होता. संजय राऊत यांची तुलना त्यांनी जोसेफ गोबेल्स केली आहे.

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची परखड भूमिका मांडली. लीलावती रूग्णालयातून काल त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, आता शिवसेना आणि विशेषत: संजय राऊत मार माधव यांच्या या टीकेला काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या