बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

मुंबई | आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काही विद्यार्थी अजूनही प्रवासात आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत.

सरकारच्या या निर्णयानंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने ठाकरे सरकार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी राजेश टोपेंवर केली आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांचं वाटोळं करण्याचा ठेका ठाकरे सरकारने घेतलेला आहे. या सरकार मधील कोणी जाणते राजे वगैरे कोणी असतील त्या सगळ्यांचा मी निषेध करतो आणि सरकारमधल्या लोकांना लाज वाटत असेल तर त्यांनी हे सरकार स्वत:हून बरखास्त केलं पाहिजे, असा हल्लाबोल राम सातपुते यांनी केलाय.

हे कर्मदरिद्री निष्ठूर सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलेले आहेत. गरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मी या सरकारला इशारा देतो की जर या सरकार मधील लोकांना जर सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या उबवायचं काम करु नये. त्यांनी राजीनामा देऊन घरी बसा, असं म्हणत राम सातपुतेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

“पालकांनो तुमचा मुलगा मुलगी काय करते याकडे लक्ष द्या”

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

राजकारणात अशा घटनांमुळे चुकीचा पायंडा पडतोय, हे अत्यंत डिस्गस्टिंग आहे- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More