Top News

“विखे जिथं जातात, तिथं खोड्या करतात”

नाशिक | अहमदनगरमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत, असा घणाघात भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.

विखे-पाटील ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. ते पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात, असा आरोप राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला आहे.

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडं सोपवण्यात आली आहे. त्यांनी नाशिक येथे बैठक घेऊन नगर जिल्ह्यातील पराभूत उमेवारांशी चर्चा केली. यावेळी राम शिंदे यांनी परखड मत मांडलं आहे.

नगर जिल्ह्यातील जागा 12-0 नं जिंकू असं विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती असं नाही. पण जी काही होती. त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या