बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांसाठी निलंबन करा”

नवी दिल्ली | सध्या संसंदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. कोरोना, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या किंमती, नवे कृषी कायदे या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तसेच पॅगेससच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागत आहे. मोदी सरकारविरोधात सर्वच विरोधक एकवटले आहेत. नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चेसाठी निमंत्रित केल्यानंतरही विरोधकांनी त्यांचा गोंधळ कायम ठेवला.

गोंधळामुळे चर्चा होत नसल्याने भाजपने विरोधकांवर सडकून टीका केली आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं निलंबन करा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. संसदेत जे खासदार सलग तीन दिवस गोंधळ घालून चौथ्या दिवशीही संसदेत गोंधळ घालून कामकाज रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम करण्यात यावा, असं त्यांनी म्हटलंय.

सरकार पक्षाचा खासदार असो अथवा विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांना हा नियम लागू करावा. संसदेचं कामकाज रोखणं हा अक्षम्य गुन्हा आहे. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवून देशाचा पैसा वाया जातो. संसदेचं कामकाज रोखल्यामुळे देशाचं नुकसान होतं. त्यामुळे सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळ गोंधळ घालून संसदेचं कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा कायदा करावा, असं आठवले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More