बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो…’; ऑडिओ क्लिपबाबत रामदाम कदम यांची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासुन भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले आहेत. किरीट सोमय्या शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेकवेळा आरोप केले आहेत. सोमय्या यांना शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने माहिती पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हे आरोप केले आहेत. माध्यमांवर प्रसाद कर्वै नाव चांगलंच गाजत आहे. प्रसाद कर्वै हे अनिल परब यांच्याविरोधातील माहिती किरीट सोमय्या यांना पुरावतो. तसेच कारवाई करण्यासाठी पाठपुरावा देखील करतो. हाच प्रसाद कर्वै शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना सर्व माहिती पुरवतो, असं संजय कदम यांनी म्हटलं आहे.

संजय कदम यांच्या आरोपांवर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी केलेले आरोप पुर्णत: खोटे आहेत. त्यात काहीही तथ्थ नाही. वैभव खेडेकर आणि संजय कदम यांचा राजकीय बाप मीच आहे, असं रामदास कदम यांनी म्हणाले. ते दोघेही आधी शिवसेनेत होते. त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात गेले. वैभव खेडेकर यांच्या अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण मी बाहेर काढली आहेत. त्यामुळे ते माझ्यावर आरोप करत आहेत असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीला हाताशी घेऊन माझ्यावर आरोप केले जात आहेत. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, मी किरीट सोमय्याशी संपर्क केलेला नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. जो माणूस माझ्या पक्षाच्या मुळावर उठलेला आहे, त्याला मी भेटेल का?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“देशातील कोणत्याही भागात गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोक म्हणतात गडकरींची कृपा”

“मला मुंबई इंडियन्सला पराभूत होताना पाहायचंय, चॅम्पियन होताना नाही”

पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला ‘त्या’ निर्णयावरून घरचा आहेर; म्हणाले…

श्रेयस अय्यर दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’! अखेरपर्यंत एकटयाने खिंड लढवत मुंबईवर केली मात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More