मुंबई | अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली सापडलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांनाच पोलिसांनी अटक केल्यामुळे विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला होता. यावरून देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली होती. अशातच आरपीआयचे नेते आणि अध्यक्ष रामदास आठवलेंनी राज्याता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
मुकेश अंबानी मोठे उद्योगपती आहेत. लाखो लोकांना त्यांनी रोजगारही दिला आहे. मुकेश अंबानींचं घर उडवण्यामागं सचिन वाझे तर आहेतच पण त्याचबरोबर आणखी कोण कोण आहे, याची चौकशी व्हायला हवी, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चाललीय. सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून झालंय. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळेच एनआयएकडे चौकशी गेली असल्याचं आठलले म्हणाले. त्यासोबतच आरपीआयकडून मी मागणी करतो की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी त्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्रही पाठवत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू झालं पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी केली आहे. तर याआधी भाजप नेते नारायण राणेंनीसुद्धा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, असं भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितलं होतं.
महाराष्ट्र मे राष्ट्रपती शासन लागु करना चाहीये। इस मांग का पत्र केंद्रीय गृह मंत्री अमित शहा जी को भेज रहा हु। pic.twitter.com/WIjspNOBy5
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 19, 2021
थोडक्यात बातम्या-
‘…जबाबदार वाझे’; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणावर अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट
‘मी बंगळुरू सोडलं नाही’; हितेशा चंद्राणीचं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्टीकरण!
“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर कूल दिसा भिकाऱ्यासारखं नाही”
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!
विराटपेक्षा रोहितच लय भारी! संघाची सूत्रं हाती आल्यावर निसटलेला सामना आणला खेचून
Comments are closed.