युती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले

रायगड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद आणि 50 ते 60 कार्यकर्त्यांना महामंडळावर घेणार आहेत. त्यामुळे एखाद्या जागेसाठी युती सोडणे योग्य नाही, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये बोलताना आठवलेंनी युती सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीबाबतची बोलणी झाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
 
विधानसभेला काही जागा मिळतील, विधानपरिषदेचीही जागा मिळेल, काही चेअरमनपदं मिळतील, त्यामुळे पक्षाने विचार केला आहे की आपण नरेंद्र मोदी यांना दगा देणे योग्य नसून व्यापक विचार करून निर्णय घेतला आहे, असंही आठवले म्हणाले.
दरम्यान, भाजपला 285 जागा मिळतील आणि एनडीएला 325 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वासही रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. 

महत्वाच्या बातम्या-

-बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी

-सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली! पाकिस्तानही आपल्या पुढे

-सोशल मीडियावर ‘उलटे कमळ’, भाजपविरोधात रासपची मोहीम

-समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

-लोकांना मूर्ख समजणे मोदींनी आता सोडावे- प्रियांका गांधी