बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही’; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठीशी

मुंबई | कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईत प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या मुलासह काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झालं असून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची वैयक्तिक पातळीवर बदनामी होत असल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे. या प्रकरणात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वानखेडे कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचं पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं आहे. तसेच समीर वानखेडे हे दलित नाही, तसा नवाब मलिक यांचा आरोपही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

‘समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर हे बाबासाहेबांचे अनुयायी असून ते दलितच आहेत. याबाबत संपूर्ण कागदपत्रे समीर यांच्या वडिलांनी मला दाखवली आणि त्यामुळे नवाब मलिक यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत’, असा घणाघात रामदास आठवले आणि पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा नवाब मलिक हे गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दररोज पत्रकार परिषद व सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू ठेवल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं मोठं विधान करत संपूर्ण रिपब्लिकन पार्टी वानखेडे कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘सर, बेइज्जती केली जातेय…’, अन् समीर वानखेडे वैतागून भडकले

पाकला बरबाद करणं आमचं पहिलं लक्ष्य; ‘या’ कारणांमुळे इसिस खुरासान गटाने दिला इशारा

“चेंबुरमधील ‘तो’ व्यक्ती आमचा मित्र नाही तर कार्यकर्ता”

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

‘मरेल पण भाजप सोबत जाणार नाही’; प्रियंका गांधींचं भाजपवर शरसंधान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More