Top News पुणे महाराष्ट्र

“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”

पुणे | मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली. मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा असल्याचं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असं सांगितलं. रामदास आठवलेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करताना चौफेर फटकेबाजी केली.

अजितदादा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येणार आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं म्हणत असल्याचंही आठवले म्हणाले.

दरम्यान, परवा मुख्यमंत्री मला म्हणाले की, आठवलेजी आता तुम्ही इकडे या. पण मी म्हणालो तुम्हीच इकडे या, असं सांगत आठवलेंनी पत्रकार परिषदेत हास्याचे कारंजे उडवले.

थोडक्यात बातम्या-

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उतरणार राजकारणात

पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

कोरोना हा महासाथीचा शेवटचा आजार नाही- WHO

कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही- राजनाथ सिंह

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या