Top News महाराष्ट्र मुंबई

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आठवलेंनी केली ही मोठी भविष्यवाणी

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांअगोदर राजकीय वातावारण तापत असल्याचं  दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर वारंवार टीका करताना दिसत आहेत. मात्र अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवलेंनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाची भविष्यवाणी केली आहे.

पश्चिम बंगालच्या दहा विधानसभा मतदारसंघात आम्ही आरपीआयचे आपण उमेदवार उभे करणार आहोत. आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार असून एनडीएचे सरकार बनणार असल्याची भविष्यवाणी रामदास आठवलेंनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. ममता बॅनर्जी आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कायम ठेवण्यासाठी पुर्ण ताकदीने लढणार असतील. तर दुसरीकडे भाजपसाठी ही निवडणूत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

दरम्यान, रामदास आठवलेंनी केलेल्या भविष्यवाणीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप विजयसाठी आपल्या मित्रपक्षांची मदत घेऊ शकतं. त्यामुळे सर्व पक्ष  निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

राजकीय पक्ष बाजूला ठेवत आपण ऊसतोड कामगारांसाठी काम करुया- सुजय विखे पाटील

“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”

नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात; ट्रकनं 7 ते 8 वाहनांना उडवल

“गुडघ्यात मेंदू असलेलं सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात”

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या