Top News महाराष्ट्र मुंबई

दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले

मुंबई | केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. हाथरसची कन्या मृत्युची झुंज देत होती तेव्हा आयुष्यमान आठवले नटींच्या घोळक्यात होते, अशी टीका सामनामधून राऊतांनी आठवलेंवर केली होती. यावर आठवलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दलित अत्याचार जिथे होईल तिथे मी पोहोचलो आहे. दलित अत्याचाराविरूद्ध मी लढलो आहे. मी दलित पँथरच्या चळवळीतून पुढे आले आहे. त्यामुळे दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की माहित नाही पण मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असल्याचं आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; हत्येचा प्रकार अंगावर काटा आणणारा

महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन- प्रकाश आंबेडकर

“शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण”

‘राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच परंपरा’; कृषी विधेयकावरून शरद पवारांवर भाजपचं टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या