बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या चिन्हावर लढलो तर आमचं काय राहिलं मग…- रामदास आठवले

मुंबई | भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलो तर आमचं अस्तित्व उरणार नाही, असं ‘रिपाइं’चे प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते.

भाजपने महायुतीतील मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र मित्रपक्षांनी आम्ही आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत. आमच्या पक्षाचं एक वेगळं अस्तित्व आहे. आम्ही भाजपच्या चिन्हावर लढलो तर आमचं काय राहिलं, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, रासपचे महादेव जानकर यांनीही भाजपच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

-सरकारच्या ‘या’ निर्णयाविरूद्ध इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

-भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून धुसपूस?? आदित्य ठाकरे म्हणतात…

-तुमची ‘नाटकं’ बंद करा अन्यथा ‘नाटक’ बंद; अभिनेता सुमित राघवन भडकला

-अखेर ठरलं! बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन जुलै महिन्यात

-राज्यातील विद्यमान 40 आमदारांचं भाजप तिकीट कापणार???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More