महाराष्ट्र मुंबई

रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली ‘ही’ ऑफर

Loading...

मुंबई | काँग्रेस आता देशात लवकर सत्तेत येईल असं वाटत नाही. त्यामुळे शरद पवारांनी महायुतीत यायला हवं, अशी ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे.

शरद पवारांचा ‘ईव्हीएम’वर संशय आहे. पण आमचा शरद पवारांवर संशय नसल्याने त्यांनी महायुतीत यायला हरकत नाही, असा टोला रामदास आठलेंनी शरद पवारांना लगावला आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आठवलेंनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, अशी टीका आठवलेंनी केली आहे.

दरम्यान, देशाच्या हितासाठी पवारांनी ‘एनडीए’मध्ये सामिल होऊन मोदींना साथ द्यावी, अशी खुली ऑफर रामदास आठवलेंनी पवारांना दिली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता

-जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

-अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

-धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या