महाराष्ट्र मुंबई

कंगणा राणावत प्रकरणी सत्ताधारी शिवसेनेनं आता दादागिरी करू नये- रामदास आठवले

मुंबई | मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगणा राणावतच्या कार्यालयावर कारवाई केली. यावरून रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेने कंगणा राणावतचा विरोध करताना अतिरेक करू नये, त्यांनी कंगणाचं कार्यालय फोडणं हा अतिरेक होता. कंगणानेही ‘जय महाराष्ट्र, जय मुंबई’, अशी भूमिका घेत आपण महाराष्ट्रभक्त असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेने कंगणा प्रकरणात शांत व्हावं, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं आहे.

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार असून कंगणाच्या संरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लक्ष देऊन विषय थांबवावा असं मी त्यांना सुचवणार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुम्हाला एखाद्या महिलेचं तोंड फोडायचं असेल तर चीन व पकिस्तानचं फोडा आणि कोणत्याही महिलेबद्दल ‘हरामखोर’ वगैरे शब्द वापरणं चूक आहे, असं म्हणत आठवलेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुढील अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अधिकाऱ्याची गाडी फोडल्याप्रकरणी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्या- सुप्रिया सुळे

भारतात PUBG गेम पुन्हा येणार?; कंपनीने घेतला मोठा निर्णय

ठाकरे सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं पण…- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या