बारामती | खडसे एकटेच राष्ट्रवादीत जातील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत 15 आमदार जाणार नाहीत, असं रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले आज अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे.
खडसेंनी रिपाइंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांना रिपाइं हा चांगला पर्याय झाला असता. पण ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.
दरम्यान, पूरग्रस्ताना केंद्रकडून मदत मिळणारच आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वात आधी राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्याने आधी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असं आठवले म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्रात सीबीआयला प्रवेश नाकारणं म्हणजे कायद्यालाच आव्हान देण्यासारखं आहे”
…म्हणून सीबीआयला महाराष्ट्रात नो एंट्री- अनिल देशमुख
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले…
“बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल”