सातारा | मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच पुन्हा सत्तेवर येईल, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं नव्हतं. कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार वादविवादात सुरू आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं. तसेच सध्या आमच्याकडे 117 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते. ते साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका केंद्र शासनाचीही आहे. केंद्राने कृषीविषयक केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहेत. तरीही कायदे मागे घ्या म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी नेतेही ऐकायला तयार नाहीत. कायदे मागे घेण्यापेक्षा त्यात बदल करण्याची मागणी त्यांनी करावी, असं अठवलेंनी सांगितलं.
रामदास आठवले यांनी यावेळी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर देखील भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा हा कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून, कोणालाही पाठीशी न घालता त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक
पुणे पोलीस ‘अॅक्शन’मोडमध्ये! गजा मारणेला बेड्या ठोकल्यानंतर शरद मोहोळवर केली ही कारवाई
काय सांगता! लोकांना सापडलाय सोन्याचा डोंगर, सोनं लुटण्यासाठी तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ
…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील- रामदास आठवले
#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
Comments are closed.