रामदास आठवलेंचा यूटर्न, गोमांस खायला विरोध!

नवी दिल्ली | गोमांस खाण्याच्या मुद्द्यावरुन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यूटर्न घेतलाय. हिंदूंच्या भावना गायीशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे लोकांनी गोमांस खाऊ नये, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलंय.

काही दिवसांपूर्वी गोमांसच्या मुद्द्यावर बोलताना, कोणी कोणाला गोमांस खाण्यापासून रोखू शकत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं होतं. 

दरम्यान, गोमांसऐवजी लोकांनी दुसऱ्या जनावरांचं मांस खावं, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या