जिग्नेश किंवा ब्राह्मण दोषी नाहीत; मराठ्यांनी हल्ले केले!

जिग्नेश किंवा ब्राह्मण दोषी नाहीत; मराठ्यांनी हल्ले केले!

नवी दिल्ली | गुजरातचा आमदार जिग्नेश मेवाणीच्या भाषणामुळे कोरेगाव भीमा गावात हिंसाचार घडला असा आरोप आहे, मात्र हा आरोप चुकीचा असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते दिल्लीत बोलत होते. 

हिंसाचाराच्या मागे पेशव्यांचे समर्थक अथवा ब्राह्मणांचा हात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्थानिक मराठ्यांनी दलितांवर हल्ला केला, असा रामदास आठवले यांचा आरोप आहे.

ज्यांनी दलित कार्यकर्त्यांवर हल्ले केले त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी रामदास आठवले यांनी केली. 

Google+ Linkedin