‘कोणीही मशिदींवरील भोंगे काढायला आलं तर…’, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
मुंबई | मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेला रिपाईचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawle) सुरूवातीपासूनच विरोध करताना दिसत आहेत.
राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण रंगताना दिसत आहेत. मशिदींवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल बोलताना रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मशिदींवरील भोंगे काढायला कोणी आलं तर आमचे कार्यकर्ते विरोध करतील असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे.
आमच्या पक्षाचे लोक मशिदींचं संरक्षण करतील. मशिदींवरील भोंगे काढायला कोणी आलंच तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्याला विरोध करतील. भोंगे काढायला आलेल्या लोकांनाही विरोध करतील. भोंगे काढण्याच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान, मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवलेंनी मुस्लीम सामुदायाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मुस्लीम समाजातील चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मौलानांनी शांत राहिलं पाहिजे, असंही आठवले म्हणाले. तर आठवलेंच्या वक्तव्यावर आता मनसे (MNS) काय प्रतिक्रिया देणार हे बघावं लागेल.
थोडक्यात बातम्या-
“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा की मुख्यमंत्रीजी”
“कोणी योगी, कोणी भोगी तर कोणी मानसिक रोगी”
मोठी बातमी! पुणेकरांना झटका, सीएनजीचे दर तिसऱ्यांदा महागले
रशिया-युक्रेन युद्धाचा तळीरामांना असाही फटका, महत्त्वाची माहिती समोर
“राणे, सोमय्या, कंगना रनौतच्या पंक्तीत आता राणाही बसतील”
Comments are closed.