‘…तर आज राज ठाकरे सुद्धा मुसलमान असते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
रिपाईचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawle) सुरूवातीपासूनच राज ठाकरेंच्या या भूमिकेच्या विरोधात दिसत आहेत. ‘एका बाजूला भोंगे दुसऱ्या बाजूला सोंगे’, असं म्हणत आठवलेंनी राज ठाकरेंना यापूर्वीही टोला लगावला होता. त्यानंतर रामदास आठवलेंनी आणखी एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर मोगलांविरूद्ध लढले नसते तर राज ठाकरे सुद्धा आज कदाचित मुसलमान असते, असं मोठं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
दरम्यान, रामदास आठवलेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आठवलेंच्या टीकेला मनसे (MNS) काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता ‘या’ गोष्टीसाठीही मोजावे लागणार पैसे
“…त्यांना मी परवडणार नाही”, बॉलिवूडबद्दल महेश बाबू बेधडक बोलला
‘राज ठाकरे चुहा है’, भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
टेंशन वाढलं! राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत
कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी चुकुनही करू नका ‘ही’ चूक
Comments are closed.